छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सध्या करोडो चाहत्यांना पोट धरून हसवत आहे. मात्र या कार्यक्रमात गुत्थीची भूमिका करणारा लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोवर लवकरच त्यातून गायब होण्याची शक्यता आहे. कलर्सवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा निर्माता आणि प्रस्तुतकर्ता कपिल शर्मा त्याच्या विनोदांमुळे लोकांना भावला पण सोबतच या कार्यक्रमातील दादी, बुआ, पलक आणि गुत्थी हे इतर पात्रही चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. गुत्थीचे हावभाव आणि गाणी तर आता तिची ओळखच बनलेत. गुत्थीचे पात्र दिवसेंदिवस लोकांच्या अधिक पसंतीला येत आहे. फेसबुकवरही गुत्थीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, गुत्थीची भूमिका लोकप्रिय करणा-या सुनील ग्रोवरने हा कार्यक्रम सोडला आहे. प्रेक्षकांना गुत्थी हे पात्र आवडले आणि त्यास भरभरुन प्रेमही दिले, याबद्दल सुनील फार आनंदी आहे. परंतु, अगोदर कबूल केलेल्या काही जबाबदा-यांमध्ये असल्यामुळे यापुढे हे पात्र करणे सुनीलला शक्य होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, तो या कार्यक्रमात पुन्हा परतण्याची शक्यताही कमीच आहे. सुनील ग्रोवरने या कार्यक्रमासाठी दिले जाणारे मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती. पण, निर्मात्यांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे त्याने कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सूत्रांनी यास दुजोरा दिलेला नाही. तसेच, कपिल शर्माही अद्याप याबाबत काहीही बोलला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
`कॉमेडी नाइट्स…`मधून ‘गुत्थी’ होणार गायब?
छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सध्या करोडो चाहत्यांना पोट धरून हसवत आहे.
First published on: 12-11-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil grover aka gutthi to quit comedy nights with kapil