टेलिव्हिजनवरील लोकप्रीय ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मध्ये कपिलच्या सासऱयाच्या भूमिकेतून शो मध्ये परतलेला सुनिल ग्रोव्हर आता आपल्या ‘गुत्थी’च्या रुपात पुन्हा अवतरणार आहे.
‘गुत्थी’ची गुत्थी सुटली!
येत्या विकेण्डला कॉमेडी नाईट्समध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या आगामी ‘एण्टरटेन्मेंट’ चित्रपटातील सहकलाकार तमन्ना भाटीया येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत प्रेक्षकांची लाडकी ‘गुत्थी’ परतणार आहे. या शो संदर्भातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील ग्रोव्हर यापुढेही गुत्थीची भूमिका कायम ठेवणार असू अधून-मधून कपिलच्या सासऱयाचीही भूमिका निभावणार आहे.
‘कॉमेडी नाइट्स’मध्ये सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन
‘गुत्थी’ भूमिकेची लोकप्रियता पाहता ज्यादा मानधनाची मागणी करत सुनील ग्रोव्हरने कॉमेडी नाईट्सला रामराम ठोकला होता. त्यानंतर सुनीलने त्याच धर्तीवर दुसरा शो सुरू केला. पण सुनीलच्या शोला अल्पावधीच गाशा गुंडाळावा लागला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा