कॉमेडीचा ‘बादशहा’ म्हणून ओळखला जाणार कपिल शर्मा लवकरच एका नव्या शोसह पुनरागमन करत आहे. सहकलाकार सुनील ग्रोवरशी झालेल्या बाचाबाचीनंतर ‘द कपिल शर्मा शो’ला उतरती कळा लागली होती. या दोघांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावं अशी चाहत्यांचीही इच्छा होती. त्यामुळे कपिलच्या नव्या शोमध्ये सुनील झळकणार का हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण आता कपिल आणि सुनीलला एकत्र आणण्यासाठी बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान प्रयत्न करत आहे. कपिलच्या नव्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सलमानने सुनीलला विचारले.

सुनील ग्रोवर सलमानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात झळकणार आहे. शूटिंगदरम्यान सलमान आणि सुनीलची चांगली मैत्रीसुद्धा झाली. तेव्हा सलमानने कपिलच्या नव्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मला विचारले होते, असं सुनीलने सांगितलं. विशेष म्हणजे कपिलच्या नव्या शोचा निर्माता सलमान खान आहे. पण व्यग्र वेळापत्रकामुळे कपिलसोबत काम करणं जमणार नाही असं सुनीलने स्पष्ट केलं.

k’सलमान खान त्याच्या शोचे निर्माते आहेत. पण चित्रपटामुळे माझ्या तारखा जुळणार नाहीत. स्टार प्लसवरील शोच्या तारखा जुळण्यासारख्या आहेत, म्हणून मी त्याला तारखा दिला,’ असं सुनील म्हणाला. त्यामुळे कपिल व सुनीलला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की.

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ हे कपिलचे दोन शो छोट्या पडद्यावर खूपच गाजले. या शोनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. याच शोमुळे विनोदवीर कपिल शर्मा हा कॉमेडीचा बादशहा आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षाही सर्वाधिक मानधन घेणारा स्टार ठरला. मात्र सहकलाकरांसोबत झालेल्या वादाच्या परिणामी कपिलचा शो बंद पडला. सोबत राहिलेल्या कलाकारांच्या मदतीनं त्यानं एप्रिल महिन्यात नवा शो सुरू केला पण पहिल्याच भागानंतर तोसुद्धा बंद पडला.

Story img Loader