छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावर एक कॉमेडियन म्हणून सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. सगळ्यांना हसवणाऱ्या सुनीलला हृदय विकार आहे. सुनील ग्रोव्हरला Heart Blockage असल्याचे समजले आहे. दरम्यान, सर्जरी करण्याआधी तो त्याच्या आगामी वेब सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे.
सुनीलच्या या हृदय विकाराबद्दल सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनील पुण्यात होता आणि त्याने त्याच्या सीरिजचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर तो आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. त्याने आपली प्रोफेशन्ल कमिटमेंट पूर्ण केली आणि त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला.
आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
सुनील सगळ्यात शेवटी Zee5वरील सनफ्लावर या सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत आशीष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी आणि मुकुल चड्ढा दिसले. या व्यतिरिक्त सुनील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत ‘तांडव’ या सीरिजमध्ये दिसला होता.