हास्यकलाकार सुनिल ग्रोवरचा नवा ‘मॅड इन इंडिया’ नावाचा विनोदी कार्यक्रम लवकरच स्टार वाहिनीवर सुरू होणार आहे. बहुचर्चित ‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’ कार्यक्रमात गुत्थी नावाची विनोदी भूमिका साकारणाऱया सुनिल ग्रोवरने याआधीच काही अंतर्गत वादाच्या कारणावरून ‘कॉमेडी नाईट्स’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुनिल ग्रोवर स्वत:चा कार्यक्रम सुरू करणार असल्याचीही चर्चा होती.
या चर्चेला खुद्द सुनिल ग्रोवरने दुजोरा देत स्टार वाहिनीवर माझा नवीन ‘मॅड इन इंडिया’ नावाचा विनोदी कार्यक्रम येणार असल्याचे जाहीर केले. तसेच मला कपील सोबत कोणत्याही प्रकारची स्पर्धा या कार्यक्रमातून करायची नाही. मी फक्त चाहत्यांचे या माध्यमातून मनोरंजन करणार आहे. असेही सुनिल म्हणाला.
कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत सविस्तर माहिती अजून देण्यात आलेली नाही. परंतु, या कार्यक्रमात मनिष पौल आणि डॉली अहूवालिया या कलाकारांचाही समावेश असणार असून मनिष कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे, तर सुनिल ग्रोवर विविध भूमिकांतून मनोरंजन करताना दिसणार आहे.
तसेच कलर्स वाहिनीने याआधीच गुत्थी या पात्राचे आणि वेशभूषेचे ‘कॉपी राईट्स’ असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्याने गुत्थीची भूमिका दुसऱया कोणत्याही वाहिनीवर सुनिल ग्रोवरने सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत कलर्सने दिले होते. त्यामुळे सुनिल ग्रोवर यावेळी अनोख्या भूमिकेत तसेच वेगळ्या वेशभूषेत दिसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा