Sunil Pal : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते सुनील पाल बेपत्ता झाल्यानंतरची तक्रार सुनील पालच्या पत्नी सरीता यांनी मुंबईतल्या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दिली होती. सुनील पाल शोसाठी बाहेर गेले आहेत आणि आज परतणं अपेक्षित होतं. मात्र ते परतलेले नाहीत त्यांचा फोनही लागत नाही असं सांगत सुनील पाल यांची पत्नी सरिता यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर आता त्यांनी या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सुनील पाल यांच्या पत्नीने काय सांगितलं होतं?
“सुनील आज घरी येणं अपेक्षित होतं, मात्र ते घरी आलेले नाहीत. तसंच त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो आहे. अनेक तासांपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे सुनील बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आले आहे.” असं सुनील पाल यांच्या पत्नीने म्हटलं आहे. IANS या वृत्त संस्थेने हे वृत्त दिलं आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील पाल ( Sunil Pal ) यांची एकदम खास मैत्री आहे. सुनील पाल यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर आता पोलीसही सक्रिय झाले आहेत. सुनील पाल ( Sunil Pal ) हे अनेकदा त्यांच्या शोसाठी मुंबईच्या बाहेर जातात. त्यांच्या पत्नीने सांगितलं सुनील मुंबई बाहेर शो करायला गेले होते, आज परतणं अपेक्षित होतं. मात्र ते परत आलेले नाहीत. त्यामुळे सुनील पाल यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र यानंतर सरिता पाल यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
सरिता पाल यांनी काय म्हटलं आहे?
“सुनील पाल यांच्याशी संपर्क झाला आहे, मी सुनील पाल यांच्याशी बोलले. तसंच सुनील पाल यांचं पोलिसांशीही बोलणं झालं आहे.” असं आता सरीता पाल यांनी म्हटलं आहे. @viralbhayani या इन्स्टाग्राम पेजने हे वृत्त दिलं आहे. त्यांच्या टीमने सरीता पाल यांच्याशी मेसेजवरुन संपर्क केला होता. त्यावेळी सरीता पाल यांनी सुनील पाल यांच्याशी संपर्क झाल्याचं म्हटलं आहे. सुनील पाल ३ डिसेंबरला म्हणजेच आज घरी येणं अपेक्षित होतं. ते शो साठी मुंबईच्या बाहेर गेले होते. सुनील पाल Sunil Pal घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन स्विच ऑफ लागत असल्याने काळजीत असलेल्या त्यांच्या पत्नीने पोलीस ठाणं गाठलं होतं. मात्र आता सुनील पाल यांच्याशी संपर्क झाल्याचं त्यांच्या पत्नीने स्पष्ट केलं आहे.