शनिवारी अमली पथक विरोधी पथकाने मुंबईत मोठी कारवाई करत क्रूझ शिपवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ड्रग पार्टीच्या संदर्भात ताब्यात घेतले होते. दरम्यान, अभिनेता सुनिल शेट्टीने या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने नुकत्याच झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये सुनील खरे रिपोर्ट बाहेर येऊ द्या असे म्हणताना दिसत आहे.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar : “तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नही…”, आशिष शेलारांचा शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

 “जेव्हा एखाद्या जागी धाड टाकण्यात येते, तेव्हा तिथे बरेच लोक असतात. म्हणून आम्ही असे गृहीत धरतो की या मुलाने ड्रग्स घेतले, या मुलाने हे केले. मला वाटते की प्रक्रिया चालू आहे, म्हणून ती तशीच ठेवा आणि त्या मुलाला श्वास घेण्यास वेळ द्या. जेव्हा आमच्या उद्योगात काहीही घडते, तेव्हा माध्यम लगेचच तुटून पडतात,” असे सुनील शेट्टी म्हणाला.

“प्रत्येकाला वाटते की हा देखील असाच असेल. त्या मुलाला एक संधी द्या आणि खरा अहवाल बाहेर येण्यासाठी वेळ द्या. अजून लहान आहे. तोपर्यंत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे.” सुनीलच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

एनसीबीने मुंबईजवळील कॉर्डेलिया द इम्प्रेस या क्रूझवर छापा टाकला, त्या पार्टीमध्ये सुमारे ६०० लोक उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात ३ मुलींचा समावेश आहे. आरसीन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांची एनसीबी चौकशी करत आहे.

Story img Loader