लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित ‘83’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा एक प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियर शो ला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर आता अनेक कलाकार हे या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता सुनिल शेट्टी यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. पण त्याच्या या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुनिल शेट्टी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावर सुनिल शेट्टी म्हणाला, “मी रणवीर सिंहचा ‘83’ चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. पण तो त्या चित्रपटात कुठेही दिसला नाही. पडद्यावर फक्त कपिल देव होते. फारच उत्कृष्ट ट्रान्सफॉर्मेशन. एका क्षणासाठी मी चकीत झालो कारण मला अगदी हुबेहूब कपिल देव असल्याचा भास झाला. ‘83’ चित्रपट पाहून अंगावर शहारे आले. या चित्रपटातील अभिनय आणि भावनांची जादू पाहून मला अजून धडधडतंय आणि माझे डोळे पाणावले आहेत.”

“ही पूर्णपणे विश्वासाची बाब असून त्याचप्रमाणे ते पडद्यावर दिसत आहे. कबीर खानचा चांगुलपणा, त्याच्या कथेवरील विश्वास, चित्रपटातील दृश्ये आणि पात्रांच्या ताकदीमुळे माझे मन जिंकलं आहे”, असेही सुनील शेट्टी म्हणाला.

‘83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

83 Movie Review : पाणावलेले डोळे अन् समाधानाने भरलेला ऊर, अंगावर काटे आणणाऱ्या विश्वचषक विजयाची कहाणी

‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.