बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सनी देओलने दसऱ्याच्या शुभ मूहुर्तावर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सनी देओल मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दमदार एण्ट्री करणार आहे. दसऱ्याला एक मोठी घोषण करणार असल्याचं ट्वीट सनीने केलं होतं. अखेर ही घोषणा करण्यात आलीय. तब्बल दोन दशकांनंतर सनी देओलच्या सुपरहिट सिनेमाचा म्हणजेच ‘गदर’चा सिक्वल घेऊन येत असल्याची घोषणा सनीने केलीय.

काही दिवसांपूर्वी ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल येणार अशी चर्चा रंगली होती. तर या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचे संकेतही दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिले होते. मात्र अखेर आज या सिनेमाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सिक्वलमध्ये देखील सनी देओल आणि अमिषा पटेल झळकणार आहेत. तर सिनेमाचं दिग्दर्शन देखील अनिल शर्माच करणार आहेत.

‘बिग बॉस १५’ शोमधील जय भानुशालीच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सनी देओलने सोशल मीडियावर या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलंय. यात कॅप्शनमध्ये लिहिलंय “दोन दशकांनंतर अखेर प्रतीक्षा संपली! दसऱ्याच्या शुभदिनी, तुमच्यासाठी सादर करत आहोत गदर-२ चं मोशन पोस्टर” या पोस्टनंतर सनी देओलच्या चाहत्यांनी आनंदं व्यक्त केलाय. तर ट्वीटरवर देखील सनी देओलने ”पुढील कहाणी” असं ट्वीट केल्याने चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

“अनेक देशात गांजाचं सेवन कायदेशीर, आपल्याच इथे…”; आर्यन खानच्या अटकेवर हंसल मेहतांच वादग्रस्त विधान

२००१ सालामध्ये आलेल्या ‘गदर- एक प्रेम कथा’ या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. सिनेमातील सकिना आणि तारा सिंहची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. यानंतर आता पुढील कथा या सिनेमाच्या सिक्वल मध्ये पाहायला मिळणार आहे.

‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि आमिषा पटेलसोबतच दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा हा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. २०२२ सालामध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader