यमला पगला दिवाना चित्रपटाच्या दुस-या भागात सनी देओलचा मुलगा करन गाणार असल्याचे कळले आहे. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्याने काही गाणीही लिहिली आहेत. आपला काका बॉबी देओल याच्यासोबत करनने काही ओळी गायल्या असून या चित्रपटाचे खरे आकर्षण असलेले तीन देओल (धमेंद्र, सनी आणि बॉबी) या गाण्यावर पाय थिरकणार आहेत. दरम्यान, देओल कुटुंबियांकडून करनला अभिनयाचंही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे तो लवकर एखाद्या नवीन चित्रपटात दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
‘यमला पगला दिवाना-२’ मध्ये सनी देओलचा मुलगा करन गाणार
यमला पगला दिवाना चित्रपटाच्या दुस-या भागात सनी देओलचा मुलगा करन गाणार असल्याचे कळले आहे. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्याने काही गाणीही लिहिली आहेत. आपला काका बॉबी देओल याच्यासोबत करनने काही ओळी गायल्या असून या चित्रपटाचे खरे आकर्षण असलेले तीन देओल (धमेंद्र, सनी आणि बॉबी) या गाण्यावर पाय थिरकणार आहेत.
First published on: 28-02-2013 at 06:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deols son karan to sing in yamla pagla deewana