बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी एक पॉर्नस्टार होती हे सर्वांनाच माहीत आहे. अर्थात सनीला तिच्या भूतकाळाबद्दल कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. पण तिचा भूतकाळ अद्याप तिची पाठ सोडायला तयार नाही. सोशल मीडियावर अनेकदा लोक तिच्या भूतकाळाचा दाखला देत तिच्यावर टीका करताना दिसतात. सनीला या सर्व गोष्टींचा फारसा फरक पडत नसला तरी ३ मुलांची आई म्हणून आता मात्र तिला भूतकाळाबद्दल भीती वाटत आहे. याचा खुलासा अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सनीनं केला.

काही दिवसांपूर्वीच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सनीनं आपल्या मुलांबाबत चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, “असं होऊ शकतं की जेव्हा माझी मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना माझ्या काही गोष्टी आवडणार नाहीत आणि ते काय आहे हे सर्वांना माहीत आहे. कदाचित बोलून काही गोष्टी सुधारता येतील आणि त्यांच्या कुटुंबावर केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. त्यांनी हे समजून घ्यायला हवं की, प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जोपर्यंत त्यामुळे कोणालाही नुकसान होतं नाही तोपर्यंत ठीक आहे.”

Image of Wepons
Online Bomb Making : घटस्फोटाचा बदला घेण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; बॉम्बचं इंटरनेवरून प्रशिक्षण घेऊन चक्क स्फोट घडवून आणला!
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Milind Gawali
“डब्यामध्ये तिळाचे लाडू होते आणि एक चिठ्ठी…”, प्रेमपत्राचा किस्सा सांगत मिलिंद गवळी म्हणाले, “ती चिठ्ठी आईला…”
sharmila tagore on actors fees
अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी स्टार्सच्या मानधनाबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “ते अभिनयापासून…”

आणखी वाचा- ‘तारक मेहता’मध्ये पुन्हा दिसणार दिशा वकानी? असित मोदी म्हणाले, “दयाबेनच्या भूमिकेसाठी…”

सनी पुढे म्हणाली, “मी माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय स्वतः घेतले आणि माझ्या मुलांनी देखील स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत असं मला वाटतं. एक पालक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन करू शकता. त्याच्या सोबत राहून त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांना पाठिंबा देऊ शकता. मग त्यांचा निर्णय काही असो.”

आणखी वाचा- आर्चीला ‘या’ खास नावाने हाक मारतो परश्या! आकाश ठोसरची पोस्ट चर्चेत

कॅनडामध्ये जन्मलेली सनी लिओनी मूळची भारतीय आहे. तिने २०११ साली डॅनिअल वेबरशी लग्न केलं होतं. २०१७ साली तिने महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका अनाथालयातून मुलगी निशाला दत्तक घेतलं. त्यानंतर २०१८ मध्ये सनी आणि डॅनिअलनं सरोगसीद्वारे अशर आणि नोआ या दोन मुलांना जन्म दिला. एकेकाळी पॉर्न स्टार असलेली सनी आज बॉलिवूड अभिनेत्री आणि ३ मुलांची आई आहे.

Story img Loader