‘हंसी तो फंसी’ आणि ‘गुंडे’ हे दोन चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही जेव्हा चित्रपटगृहात प्रवेश करता आणि चित्रपट पाहण्यासाठी स्थिरस्थावर होता, तेव्हढ्यात सनी लिओनची मोठ्या पडद्यावरील मादक अदा आणि गरमागरम दृष्ये पाहून चित्रपटगृहातील वातावरण अचानक गरम झाल्याचे जाणवू शकते. संपूर्णपणे सनी लिओनवर केंद्रित असलेल्या बालाजीच्या ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटाचा स्पेशल प्रोमो सध्या या दोन चित्रपटांबरोबर दाखविण्यात येत आहे. सनी लिओनच्या मादक अदांमुळे या छोट्याशा प्रोमोकडे प्रेक्षक आकर्षित होतात, ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटाची प्रसिद्धी होते आणि या चित्रफितीद्वारे प्रेक्षकवर्गाला चित्रपट पाहाताना पाळावयाच्या शिष्टाचाराची शिकवणूक दिली जाते. या तीन गोष्टी हा प्रोमो दाखविल्याने साध्य होत असल्याचे चित्रपटाशी संबंधीत सूत्रांचे म्हणणे आहे. ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटाच्या प्रोमोची झलक यूट्युबवर आधीपासूनच उपलब्ध आहे. प्रोमोच्या या व्हिडिओची सुरूवात सनी लिओनच्या मादक अदाकारीने होते. त्याचवेळी मागच्या बाजुला एक पंजाबी गाणे सुरू असते. पुढच्याच क्षणी ती एका बेडवर काही मादक हावभाव साकारत असताना अचानक व्यत्यय आणणारी मोबाईल फोनची रिंग वाजते आणि अनेकांची निराशा होते. या मोबाईल फोनच्या वाजण्याने वैतागलेली सनी पुढे काहीही करण्यास नकार देऊन बेडवरून निघून जाते.
चित्रपट सुरू असताना मोबाईल फोनची रिंग मोठ्या आवाजात वाजणे किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलून चित्रपट पाहण्याऱ्यांमध्ये व्यत्यय आणणे, अशा गोष्टी अनेकवेळा आढळून येतात. या प्रोमोद्वारे आपल्या मादक अदाकारीने सनी लिओन प्रेक्षकांना अशा वाईट सवयींपासून दूर राहण्याचा संदेश देत आहे. ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही आठवडे शिल्लक राहिले असताना, प्रेक्षकांना चित्रपट पाहात असताना मोबाईल फोन बंद ठेवण्याची शिकवण सनी देत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Story img Loader