सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओ आणि मीम्समुळे चर्चेत राहाणारी सनी लिओनी यावेळी कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर चक्क सनी देओलमुळे चर्चेत आहे. तिने अभिनेता सनी देओलची शेकडो लोकांच्या गर्दीत जाहिर माफी मागितली. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तिने अशी कुठली चुक केली? की ज्यामुळे तिच्यावर माफी मागण्याची वेळ आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३५ वर्षानंतर रजनीकांत-कमल हासन येणार एकत्र

… म्हणून सनी लिओनीने मागितली सनी देओलची माफी

अलिकडेच ‘आंतरराष्ट्रीय भोजपुरी चित्रपट पुरस्कार’ सोहळा सिंगापूर येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक नामवंत बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान सनी लिओनीला पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रण दिले गेले. त्यावेळी तिने सनी देओलची माफी मागितली. ती म्हणाली, “सनी कृपया मला माफ करा. माझे आणि तुमचे नाव सारखेच आहे, त्यामुळे अनेकदा माझ्यामुळे तुमच्यावर ट्रोल होण्याची वेळ येते. अनेकदा नेटकरी सनी या नावाने मीम्स व्हायरल करतात. ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. याबद्दल कृपया मला माफ करा” अशा शब्दात तिने माफी मागितली.

सनीने माफी मागितल्यानंतर सर्वांचे लक्ष आता दुसऱ्या सनीच्या दिशेने गेले. परंतु त्याने काहीही न बोलता केवळ हसून प्रतिक्रिया दिली. हा गंमतीदार प्रसंग पाहून सभागृहातील सर्व प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone apologises to sunny deol mppg