बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑन सोमवारी पारनेर तालुक्यातील (जिल्हा नगर) शहंजापूर या छोटय़ाशा गावात अवतरली. तिच्या आगमनाबाबत संबंधितांनी कमालीची गुप्तता पाळली होती, परंतु तरीही ही बातमी फुटलीच. त्याची कुणकुण तरूणाईस लागताच शहंजापूरच्या डोंगरावर सनी लिऑनला पाहण्यासाठी तरूणांची एकच झुंबड उडाली.
तालुक्यातील शहंजापूर येथील डोंगरावर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सनी लिऑनने सोमवारी हजेरी et02लावली. ‘वन नाईट स्टॅंन्ड’ या हिंदी चित्रपटातील एका प्रसंगाचे येथे चित्रीकरण करण्यात आले. सनी लिऑन समवेत अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज हा अभिनय करीत आहे. सुझलॉन कंपनीने या डोंगरावर तयार केलेल्या रस्त्यावर सनी व तनुज यांची अचानक भेट होते. तेथे दोघांचा संवाद होतो. एवढय़ाच प्रसंगाचे येथे चित्रीकरण करण्यात आले. या प्रसंगात परिसरातील सुझलॉनच्या पवनचक्क्यांची पाश्र्वभूमीही चित्रित करण्यात आली आली आहे.
सनी लिऑन येणार असल्याने चित्रपटाच्या निर्मात्याने सुपे पोलिस ठाण्यात रितसर अर्ज करून पोलीस संरक्षणही घेतले होते. लिऑन हिच्या समवेत तिचे खाजगी अंगरक्षकही होते. खाजगी अंगरक्षकांमुळे सनीजवळ जाणेही दुरापास्त होत होते. छायाचित्र काढण्यासाठीही अंगरक्षक मज्जाव करीत असल्याने तरूणांचा चांगलाच हिरमोड झाला. सनी लिऑन रविवारी येणार असल्याची तरूणांमध्ये चर्चा होती. निर्मात्यांनी तसे पोलिसांनाही कळविले होते. परंतु चकवा देत रविवार ऐवजी सोमवारी तिला शहंजापूर येथे दाखल करण्यात आले. या चित्रपटाचे रविवारी नाशिक येथे काही चित्रीकरण करण्यात आले. शहंजापूर येथील चित्रीकरणही पुर्ण झाले असून आता पुणे येथील बंगल्यात पुढील चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सनी लेऑन बरोबरच ती घेऊन आलेल्या रेंजरोव्हर या आलिशान गाडीचेही तरूणांना आकर्षण होते. लिऑन परतत असताना
तरूणांच्या गाडय़ांचा ताफा अनेक किलोमीटर तिच्यासमवेत होता. मुख्य रस्त्याला आल्यानंतर मात्र ‘रेंजरोव्हर’ने घेतलेला वेग तरूणांच्या मनाला सनी लेऑनची हुरहूर लावून गेला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader