बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑन सोमवारी पारनेर तालुक्यातील (जिल्हा नगर) शहंजापूर या छोटय़ाशा गावात अवतरली. तिच्या आगमनाबाबत संबंधितांनी कमालीची गुप्तता पाळली होती, परंतु तरीही ही बातमी फुटलीच. त्याची कुणकुण तरूणाईस लागताच शहंजापूरच्या डोंगरावर सनी लिऑनला पाहण्यासाठी तरूणांची एकच झुंबड उडाली.
तालुक्यातील शहंजापूर येथील डोंगरावर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सनी लिऑनने सोमवारी हजेरी
सनी लिऑन येणार असल्याने चित्रपटाच्या निर्मात्याने सुपे पोलिस ठाण्यात रितसर अर्ज करून पोलीस संरक्षणही घेतले होते. लिऑन हिच्या समवेत तिचे खाजगी अंगरक्षकही होते. खाजगी अंगरक्षकांमुळे सनीजवळ जाणेही दुरापास्त होत होते. छायाचित्र काढण्यासाठीही अंगरक्षक मज्जाव करीत असल्याने तरूणांचा चांगलाच हिरमोड झाला. सनी लिऑन रविवारी येणार असल्याची तरूणांमध्ये चर्चा होती. निर्मात्यांनी तसे पोलिसांनाही कळविले होते. परंतु चकवा देत रविवार ऐवजी सोमवारी तिला शहंजापूर येथे दाखल करण्यात आले. या चित्रपटाचे रविवारी नाशिक येथे काही चित्रीकरण करण्यात आले. शहंजापूर येथील चित्रीकरणही पुर्ण झाले असून आता पुणे येथील बंगल्यात पुढील चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सनी लेऑन बरोबरच ती घेऊन आलेल्या रेंजरोव्हर या आलिशान गाडीचेही तरूणांना आकर्षण होते. लिऑन परतत असताना
तरूणांच्या गाडय़ांचा ताफा अनेक किलोमीटर तिच्यासमवेत होता. मुख्य रस्त्याला आल्यानंतर मात्र ‘रेंजरोव्हर’ने घेतलेला वेग तरूणांच्या मनाला सनी लेऑनची हुरहूर लावून गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा