पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. आता सनीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत गप्पा मारताना दिसते. सध्या सनीने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.
सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मालदिवमधील आहे. व्हिडीओमध्ये सनी समुद्र किनारी बसली असून तेथे शार्क असल्याचे दिसत आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘मला ही जगा आवडली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : पहाटे ४ वाजता मिका सिंगला दारात पाहून अशी होती सनी लिओनीच्या पतीची प्रतिक्रिया
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सरोगसीचा हृदयद्रावक अनुभव सांगितला होता. त्यावेळी तिला किती दुःख आणि समस्यांचा सामना करावा लागला हे देखील तिने सांगितले होते. या मुलाखतीत सनीने सांगितले की त्यांच्या सरोगसीसाठी जवळपास दीड ते दोन वर्षं लागली. त्यावेळी अशीही परिस्थितीही निर्माण झाली होती. सनी आणि तिचा पती डॅनिअल यांना बऱ्याच दुःखाचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे त्यांनी सरोगसीचा हट्ट सोडून निशाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता.