काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून सनी लिओनीने भारतात पदार्पण केलं. त्यानंतर सनीने तिची ‘पॉर्नस्टार’ ही ओळख न लपवता भारतीय चित्रपटसृष्टीतही पाय ठेवला. नुकताच तिच्या जीवनावर आधारित वेब सीरिजसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सनीने तिची आणि डॅनियलची प्रेमकहाणी सांगितली. यावेळी पॉर्नस्टार म्हणून दुसऱ्या पुरुषांसोबत काम करताना तिचा पती डॅनियलला काय वाटायचं, हेसुद्धा सनीने सांगितलं. डॅनियल वेबर आणि सनीची पहिली भेट, त्यांच्यात झालेली मैत्री आणि त्यानंतर मैत्रीचं प्रेमात रुपांतर यांविषयी सनी मोकळेपणाने व्यक्त झाली. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या पेजवर तिने हे शेअर केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या मुलाखतीत सनी म्हणाली :

‘डॅनियल आणि माझी पहिली भेट अमेरिकेतील लास वेगासच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्याच्या म्युझिक बँडमधल्या एका मित्राच्या ओळखीने आम्ही भेटलो होतो. मला पाहताच क्षणी डॅनियल माझ्या प्रेमात पडला. बरेच प्रयत्न करून त्याने माझा फोन नंबर आणि ई- मेल आयडी मिळवला. माझा नंबर मिळाल्यावरही त्याने ई- मेलद्वारे माझ्याशी संपर्क साधला हे मला सर्वात जास्त आवडलं होतं. काही कामानिमित्त मी न्यूयॉर्कला जात होते आणि योगायोगाने डॅनियलही तिथंच राहत होता. त्यावेळी ई- मेल पाठवून त्याने मला डेटसाठी विचारलं.’

‘डॅनियलसोबतच्या पहिल्या डेटला मी एक तास उशिरा पोहोचले होते. पण अजिबात राग न करता तो माझी वाट पाहत होता. आम्ही तीन तास गप्पा मारत होतो. ते क्षण अविस्मरणीय आहेत.’

‘डॅनियल अत्यंत समजूतदार आहे आणि प्रत्येक गोष्टीत तो माझी साथ देतो. अडल्ट फिल्म्समध्ये मी दुसऱ्या पुरुषांसोबत काम करताना डॅनियल फार अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे त्याने माझ्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून एका कंपनीची सुरुवात केली.’

‘जेव्हा माझ्या आईचं निधन झालं. तेव्हाही तो माझ्यासोबत होता. फक्त माझ्यासोबतच नाही तर माझ्या कुटुंबासोबतही होता. मी दचकून रात्री रडून उठायचे त्यावेळी तो मला मिठीत घ्यायचा. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर डॅनियलने मला प्रपोज केलं. आज सात वर्ष झाली, पण आताही आम्ही तसेच आहोत. या जगात अशक्य असं काहीच नाही यावर विश्वास ठेवण्यास त्याने मला शिकवलं. स्वत:च्या स्वप्नांप्रमाणेच त्याने माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी साथ दिली.’

सनी लिओनी आणि डॅनियल वेबरने सात वर्षांपूर्वी लग्न केलं. या दोघांना तीन मुलं आहेत. निशाला सनी- डॅनिलयने दत्तक घेतलं तर नोवा आणि अॅशरचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone finally reveals how husband daniel weber felt about her work in adult films