SUNNY-450पुन्हा एकदा ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने आपले जलवे दाखवले आहेत. ‘एक पहेली लीला’ या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला असून, चित्रपटप्रेमींकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटातील एका गाण्यात सनीला दुग्धस्नान घालण्यात आले आहे. आधीच सुंदर असलेल्या सनीला दुग्धस्नान घेताना पाहाणे म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी दुग्ध-शर्करा योगच म्हणावा लागेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनीला १०० लिटर दुधाने स्नान घालण्यात आले. या गाण्याला हॉट बनविण्यासाठी चित्रपटकर्ते आणि सनीने कोणतीही कसर सोडली नसल्याचे चित्रपटाची झलक पाहूनच ध्यानात येते. चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध होताच चित्रपटाविषयी चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या सुपरहिट साँग ‘ढोली तारो ढोल बाजें’ गाण्यावर ती चित्रपटात थिरकताना दिसणार आहे. ऐश्वर्याच्या या गाण्यावर पदन्यास करणारी सनी ऐश्वर्याला कशी टक्कर देते, हे पाहाणे सनीच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटो गॅलरी : ‘क्वीन’ सनी लिओनी

‘ढोली तारों’वर सनी थिरकणार!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone for the film leela bathes in 100 litres of milk
Show comments