बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला नक्कीच भारतीय प्रेक्षकांची नस कळली आहे. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत तिने हळूहळू बॉलिवूडमध्ये उत्तम जम बसविला आहे. ‘रागिणी एमएमएस २’ या तिच्या शेवटच्या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली. २०१४ मध्ये इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये तिने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता ती ऑनलाईन टॅलेन्ट रिअॅलिटी शोमध्ये मार्गदर्शकाच्या रुपात समोर येणार आहे. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, सनी लिओनी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या गायक, नर्तक आणि अभिनेत्यांना कशाप्रकारे व्हिडिओ शूट करावा आणि काय शूट करावे, याचा सल्ला देताना दिसणार आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्यातील कलागुण दर्शविणारा व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर अपलोड करायचा असून, त्यांच्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रतिसादावर स्पर्धेचा निकाल अवलंबून राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा