बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. अभिनयासोबतच सनी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. सनी तिचे व्हिडीओज आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरही सनीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून सनीच्या प्रत्येक पोस्टला पसंती मिळतना दिसते. यातच सनीची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात एका नेटकऱ्याने सनीला खुलेआम धमकी दिली आहे.
सनी लिओनीने नुकताच तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सनीने एक काळ्या रंगाचं टीशर्ट परिधान केल्याचं दिसतंय. कानात लाल रंगाचे तिने कानातले घातले आहेत. ‘मूड’ असं कॅप्शन सनीने या फोटोला दिलंय. अनेकांनी सनीच्या या फोटोला पंसंती दिलीय. मात्र एका युजरने दिलेल्या कमेंटमुळे सध्या सनी चर्चेत आहे.
Mood!!! pic.twitter.com/6bofzQKwXS
— sunnyleone (@SunnyLeone) June 27, 2021
हा युजर म्हणाला, ” तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आणि जर तू रिप्लाई दिला नाहीस तर मी ते व्हायरल करेन, हे माझं वचन आहे आणि माझं वचनच माझं शासन आहे.” युजरचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. सनीने त्याचं हे टीव्ह रिट्वीट केलंय.
तुम्हारे कुछ Video मेरे पास है अगर तुमने रिप्लाई नही किया तो मै वो Video वायरल कर दूंगा; ये मेरा वचन है और मेरा वचन ही है मेरा शासन
— ChowkidaR अbhiŇ मौर्य (@AbhiMaurya8543) June 29, 2021
हे देखील वाचा: अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
काही दिवसांपूर्वीच सनीने बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे देखील सनी चांगलीच चर्चेत आली होती. सनीने या फोटोशूटमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सनीच्या या सेमी न्यूड फोटोवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.