पॉर्न स्टार सनी लिओनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जखमी झाली आहे. टीना आणि लोलोचे चित्रीकरण सुरु असताना ही घटना घडली आहे.
हा अॅक्शन चित्रपट असल्यामुळे चित्रपटातील दोन्ही अभिनेत्री करिष्मा तन्ना आणि सनी लिओनी यांना काही स्टंट करावे लागत आहेत. मात्र, हीच स्टंटबाजी सनीच्या जीवावर बेतता बेतता राहिली. डॉक्टरांना सनी लिओनीला काही दिवसांकरिता संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही अभिनेत्री स्टंट करत असताना आम्ही सुरक्षितता बाळगण्याचा प्रयत्न करूनही सनी लिओनी जखमी होणे ही दुर्देवी गोष्ट आहे. पण, तीला जास्त दुखापत झालेली नाही. मात्र, यापुढे आम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ, असे चित्रपट दिग्दर्शक देवांग ढोलकिया म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
सनी लिओनी शूटींग दरम्यान जखमी
पॉर्न स्टार सनी लिओनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जखमी झाली आहे
First published on: 11-11-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone injured during film shoot