परदेशातून आलेल्या तारकांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागतेच असे नाही. त्यांचा प्रवेश अगदी सहजरीत्या होतो. यातले अगदी ताजे उदाहरण सनी लिओनीचे आहे. सनीसाठी ‘बिग बॉस’ या शोमुळे बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी, एकूणच तिची उपस्थिती अनेकांना ‘भावली’. त्यामुळेच एकताच्या चित्रपटात तिला मिळालेले आयटम साँगही प्रेक्षकांच्या तोंडी आजही अगदी ताजे आहे. आता या सनीला वेध लागलेत ते हिंदी भाषा शिकण्याचे. भाषेच्या प्रेमाखातर सनीने हिंदी शिकण्याचा निर्णय घेतलेला आहे असे ऐकिवात येतेय. परंतु त्यामागचे मुख्य कारण म्हणजे एकता कपूरने सनीला हिंदी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
एकताच्या आगामी चित्रपटामध्ये सनीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने तिनेही हिंदी शिकणे मनावर घेतले. आता सध्या सनी आणि तिचा नवरा दोघेही हिंदी शिकण्यासाठी आठवडय़ातले तीन दिवस काढत आहेत. चित्रपटामध्ये काम मिळण्यासाठी का होईना सनीने हिंदी शिकण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे एकता मात्र तिच्यावर भलतीच खुश झालेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2013 रोजी प्रकाशित
सनी लिओनी हिंदी शिकतेय!
परदेशातून आलेल्या तारकांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागतेच असे नाही. त्यांचा प्रवेश अगदी सहजरीत्या होतो.

First published on: 07-09-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone learning hindi