‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटाचा शेवट तणावग्रस्त आणि अतिशय भितीदायक झाला असून, हे संपूर्ण दृष्य सनी लिऑनवर चित्रीत करण्यात आले आहे. या दृष्यातील आपली कामागिरी पाहून सनी लिऑनने समाधान व्यक्त केले आहे. सनी लिऑनवर चित्रीत करण्यात आलेले चित्रपटाचे शेवटचे दृष्य अत्यंत भितीदायक आणि अंगावर रोमांच आणणारे आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलग चित्रीकरण करण्यात आलेले हे दृष्य अतिशय घाबरवणारे झाले असून, ते खूप शारीरिक मेहनत घ्यायला लावणारे होते. परिणामी हे दृष्य चित्रीत करताना सनी लिऑनला एक अभिनेत्री म्हणून आपले सर्व कसब पणाला लावावे लागले. असे असले तरी अंतिम दृष्यातील सनीचा अभिनय पाहून चित्रीकरणाशी निगडीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जवळजवळ १५ मिनिटांचे हे दृष्य साकारताना सनी लिऑनला फार परिश्रम घ्यावे लागल्याचे समजते. याविषयी बोलताना सनी म्हणते, मागील आठवड्यातच चित्रपटाचे अंतिम दृष्य पाहिले. भारतीय चित्रपटातून अशाप्रकारचे दृष्य मी कधीही पाहिले नसल्याचे खात्रीलायकपणे सांगू शकते. अतिशय तणावग्रस्त आणि भितीदायक अशा या दृष्याची केवळ हॉलिवूडमधील भयपटातील दृष्याशीच तुलना होऊ शकते. उत्तम कॉम्युटर ग्राफिक्स, अभिनय आणि पार्श्वसंगीत यांचा मिलाफ असलेले हे तणावपूर्ण आणि भितीदायक दृष्य योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी झाले आहे. जरी चित्रपटातील बहुतांश भागात सनी ग्लॅमरस अवतारात दिसत असली, तरी जसजसा चित्रपट शेवटाला येतो तसतशी सनी एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
सनी लिऑन ‘रागिणी एमएमएस-२’च्या अंतिम दृष्याच्या प्रेमात
'रागिणी एमएमस २'चा शेवट तणावग्रस्त आणि अतिशय भितीदायक झाला असून, हे संपूर्ण दृष्य सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आले आहे.

First published on: 11-03-2014 at 05:40 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsसनी लिओनीSunny Leoneहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone loves the climax of ragini mms 2%e2%80%b2