सनी लिओनी ही सध्या बॉलिवूडचा एक अतूट भाग झाली आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये काम करायला आलेली सनीला प्रेसक्षकांनीही लगेच स्वीकारलं. काही चित्रपटात आयटम नंबर तर काही चित्रपटात छोटीशी भूमिका करत तिने स्वतःचा चांगलाच जम इथे बसवला आहे. इतकंच नाही तर कित्येक रीयालिटि शोमध्येही ती आपल्याला दिसते.

सनी तिच्या हॉट, ग्लॅमरस आणि मादक अदांसाठी चांगलीच चर्चेत असते. सनीचा भूतकाळ जरी मागे राहिला असला तरी अजूनही बरीच लोकं तिला त्याच दृष्टिकोनातून बघतात आणि सोशल मीडियावर तिला ट्रोल करत असतात. याच कारणामुळे आणि मुलांच्या भवितव्यासाठी तिने तिच्या घरात ‘नो सोशल मीडिया’ हा दंडक घातला आहे. याविषयीच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनीने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

सनी म्हणते, “आमची तिनही मुलं सध्या बरीच लहान आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय याची जाणीव नाही. त्यांनी आत्ता त्यांचं बालपण अनुभवायला हवं. जगात काय चाललंय किंवा त्यांच्या आई वडिलांबद्दल कोण काय बोलतंय याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. आम्ही घरात असताना एकमेकांशी सगळं शेअर करतो. आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा सोशल मीडिया बघायचं कटाक्षाने टाळतो. सोशल मीडियावर आमच्याविषयी बरंच नकारात्मक बोललं जातं, लिहिलं जातं पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.”

सनी ही तिच्या बोल्ड अंदाजाप्रमाणे बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. तिला सोशल मीडियावर बरंच वाईट साईट बोललं जातं, तिच्याविषयी अफवा पसरवल्या जातात. पण ती तिच्या कामात व्यस्त असते. पुढच्या वर्षी ‘द बॅटल ऑफ भीम कोरेगांव’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे, या चित्रपटात तिच्याबरोबर अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader