बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडनंतर आता सनी मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे.
लवकरच सनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई‘ या गाण्यावर थिरकताना दिसणार अशा चर्चा सुरु आहेत. यापूर्वी सनीने ‘बॉईज’ या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’या गाण्यात सनी दिसली होती. आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुड ने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार रंगली आहे. आता या आधुनिक ‘शांताबाई’चा लूक कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : “आम्हाला आता माहित झालं…”, अमिताभ यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर केली Cryptic पोस्ट?
‘शांताबाई’ या गाण्याने २०१५मध्ये महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात अक्षरश:धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ कोटी हुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले आहे. तर महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे दिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गाणं असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित केली आहे.
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
सनीने बॉलिवूडनंतर तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. आमदार निवास’ या चित्रपटाआधी सनीने बॉईज या चित्रपटातील आयटम सॉंगवर डान्स केला होता. तर आमदार निवास या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजीव कुमार राठोड करत आहेत.