पॉर्नपरी सनी लिऑनीने पॉर्न चित्रपटांना अलविदा केला आहे. होय! सनीने आता पॉर्न चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉर्न चित्रपटात काम करणारी म्हणून ओळख असलेली सनी रिअॅलिटी गेम शो ‘बिग बॉस’मध्येदेखील याच कारणाने चर्चेत होती. त्यानंतर सनीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. बॉलिवूडमधील पदार्पणातच तिने पुजा भट दिग्दर्शित आणि निर्मित ‘जिस्म-२’ चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’मध्ये तिने एक आयटम साँगदेखील केले. त्यापाठोपाठ ती ‘जॅकपॉट’ चित्रपटात दिसली. अलिकडेच ती ‘रागिणी एमएमएस-२’ या एकता कपूरच्या चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिचा अभिनय बऱ्यापैकी वाखाणला गेला. चित्रपटातील ‘बेबी डॉल’ या सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याने तर चांगलीच प्रसिध्दी मिळवली. आता ती एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हिला’ या बहुचर्चित कार्यरक्रमात निखिल चिनपाबरोबर सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. हळूहळू सनी भारतीय मनोरंजनाच्या क्षेत्रात पाय रोवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपला भूतकाळ बदलू न शकणारी सनी लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. तिला स्वत:ची पॉर्नपरी ही ओळख मिटवायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone says bye to porn