अभिनेत्री सनी लिओनीमुळे दिल्लीतल्या एका तरुणाला त्रास सहन करावा लागला होता. कारण त्याच्या फोन नंबरवर सनी लिओनीला संपर्क करण्यासाठी दररोज सुमारे ३०० फोन येत होते. अखेर सनीने त्या तरुणाची माफी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अर्जुन पटियाला’ या सिनेमात अभिनेत्री सनी लिओनीने एका सीनमध्ये तिचा फोन नंबर सांगितला. तिने हा नंबर सांगितल्यावर लोकांना वाटतंय की हा तिचाच नंबर आहे. मात्र हा फोन नंबर दिल्लीतील प्रीतमपुरा भागात वास्तव्य करणाऱ्या पुनीत अग्रवाल या तरुणाचा आहे. त्यामुळे लोक सनी लिओनीशी बोलायचं आहे असं सांगत पुनीतला दररोज फोन करत आहेत. पुनीत त्यांना मी सनी लिओनी नाही हे सांगून सांगून थकला आहे. सिनेमातल्या एका सीनमुळे पुनीतची डोकेदुखी वाढली आहे. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सनीने निर्मात्यांच्या वतीने त्या तरुणाची माफी मागितली आहे. ‘तुम्हाला त्रास देण्याचा आमचा उद्देश नव्हता,’ असं ती म्हणाली.

आणखी वाचा : लेखिकेसोबत पतीच्या अफेअरमुळे दिया मिर्झाचा संसार मोडला?; जाणून घ्या सत्य 

दररोज येणाऱ्या शेकडो फोन कॉल्सना वैतागून पुनितने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काही नंबर्सवरुन कॉल करणारे लोक त्याच्याशी थेट अश्लील भाषेतच बोलू लागल्याची तक्रार त्याने केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone says sorry to delhi man for giving out his number in the film ssv