‘रागिनी एमएमएस २’ चित्रपटातील ‘बेबी डॉल’ गाण्यासाठी सनी लिऑनीने पिंज-यात नृत्य केले आहे. या चित्रपटात सनी लिऑनीने दिलेल्या बोल्ड दृश्यांमुळे सिनेरसिकांमध्ये या गाण्याबद्दल खुपच उत्सुकता होती. सनीने या गाण्यातील नृत्यासाठी तब्बल सहा तास रिहर्सल केल्याचे सांगितले जात आहे. पिंज-यात उभे राहून नृत्य करणे खुपच अवघड होते तरीसुद्धा या गाण्यात सनी लिऑनी अधिक बोल्ड दिसावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये १२ फेब्रुवारी रोजी  बेबी डॉल’ या गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सनी लिऑनी या गाण्यावर परफॉर्मन्स सादर करणार आहे.  

Story img Loader