बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनी बऱ्याच वेळा तिच्या मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते. सनीला तीन मुलं असून निशा, आशर आणि नोहा अशी त्यांची नावं आहेत. तिची मुलं बऱ्याचवेळा सोशल मीडियावर चर्चेत असतात. या सगळ्यात बऱ्याचवेळा तिच्या पालकत्वावर प्रश्न केला जातो. यावर सनीने नाराजी व्यक्ती केली होती.
नुकताच, सनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हे दोघेही त्यांची मुलगी निशासोबत दिसले होते. मात्र यादरम्यान सनी किंवा तिच्या पतीने निशाचा हात धरला नाही. सनीचा हा फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आणि त्यांच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले.
आणखी वाचा : ‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत ‘शेर शिवाजी’
दरम्यान ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या रिपोर्ट नुसार, सनी म्हणाली, “सोशल मीडियावरील अशा कमेंटकडे मी लक्ष देत नाही. पण, डॅनियल सर्वकाही वाचतो. कारण, त्याच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही गोष्टींचा परिणाम होतो. त्यात जर आमच्या मुलीविषयी काही कमेंट असतील तर त्याचा डॅनियलवर खूप परिणाम होतो. आधी माझ्यावरही याचा परिणाम व्हायचा. पण आता मी यासगळ्याकडे लक्ष देत नाही. सनी पुढे म्हणाली- ‘मला त्याला सांगायचे होते की हे लोक तुला ओळखत नाही की तू किंवा आपण आपल्या मुलांसाठी काय करतो. हे त्यांना याबद्दल माहिती नाही.”