अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सनीच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. काही पोस्टमुळे सनीनं कौतुक होतं तर काही वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. काही दिवसांपूर्वीच सनीला, ‘प्रसिद्धीसाठी मुलगी निशाला दत्तक घेतलं’ असं म्हणत तिला काही लोकांनी ट्रोल केलं होतं. त्यावर आता सनीनं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वी सनी लिओनीचा तिच्या मुलांसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती तिच्या दोन्ही मुलांचा हात पकडला होता. मात्र मुलगी निशा एकटीच चालत होती. त्यामुळे सनीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर आता सनीनं मौन सोडलं आहे. DNA ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली, ‘मला वाटतं ज्या लोकांनी माझ्याबद्दल असं लिहिलं किंवा बोललं आहे ते माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीयेत. एका फोटो किंवा व्हिडीओ माझं पालकत्व कसं आहे किंवा मी कशी आहे हे सांगू शकत नाही. घरी राहून माझ्याबद्दल मत व्यक्त करण्यापेक्षा माझं आयुष्य ५ मिनिटांसाठी जगून पाहा.’

आणखी वाचा- ‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

सनी पुढे म्हणाली, ‘माझ्यावर अशाप्रकारे टीका करणं अतिशय वाईट आहे. जेव्हा तुम्ही आई बाबा होता, मुलांचं संगोपन करता तेव्हा खरं पालकत्व काय आहे हे तुम्हाला समजतं. ज्यांना मुलं आहेत त्यांना माहीत असेल की पालक असणं म्हणजे काय आहे. पण जे लोक मला फक्त ट्रोल करत आहेत त्यांना सांगेन की तुमचे विचार बदला.’

आणखी वाचा- हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

दरम्यान सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे तीन मुलांचे पालक आहेत. मुलगी निशाला सनी आणि डॅनिअल यांनी दत्तक घेतल होतं. तर अशर आणि नोहा या दोन्ही मुलांना त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे. सनी लिओनी अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.