सनी लिओनीने आतापर्यंत दोन खानसोबत काम केले आहे. सलमानसोबत ‘बिग बॉस’मध्ये काम केल्यानंतर आता ती शाहरुखसोबत त्याचा आगामी सिनेमा ‘रईस’मध्ये दिसणार आहे. तसेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमिरने तिला आश्वासन दिले आहे की तो तिच्यासोबत लवकरच काम करणार आहे. त्यामुळे तिन्ही खानसोबत काम करण्याची संधी मिळालेल्या अभिनेत्रींमध्ये ती लवकरच सहभागी होणार आहे.

सिनेसृष्टीतील कोणत्याही व्यक्तीला भेटण्यामध्ये सलमान पहिला होता. ‘बिग बॉस’च्या घरात जाताना त्याने मला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या एका गोष्टीनेच मी खूप सुखावले होते. नंतर मी तिनही खानला भेटले. आता तुम्ही मला विचारलं की तुला कोणता खान सर्वाधिक आवडतो याचे उत्तर खरंच खूप कठिण आहे. त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. ते तिघंही स्वभावाने एवढे चांगले आहेत की मी स्वतःला भाग्यवान समजते.

शाहरुखने मला त्याच्या ‘रईस’ सिनेमात काम करण्याची संधी दिली. त्याला जेवढे धन्यवाद बोलेन तेवढे कमीच आहेत. शाहरुख आणि माझ्यात काही गोष्टींबाबत साम्य आहे. आम्ही दोघंही प्रशांत सावंत यांच्याकडूनच ट्रेनिंग घेतो. चित्रिकरणानंतर मी आणि माझा नवरा डॅनियल शाहरुखसोबत गप्पा मारत बसायचो. यावेळी शाहरुख त्याचे अमेरिकेतील अनुभव, त्याचे कुटुंब यांबद्दल गप्पा मारायचो. आमच्यातले ते संभाषण खरेच खूप चांगले होते.

दरम्यान, ‘लैला ओ लैला’ या आयटम साँगच्या निमित्ताने सनी शाहरुखसोबत पहिल्यांदा काम करताना दिसणार आहे. शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सनीने आनंद व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी सनीने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले होते की, ‘मनोरंजनाच्या या दुनियेत काही लोक असे असतात, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतात. धन्यवाद… शाहरुख आणि राहुल ढोलकिया मला एक संधी दिल्याबद्दल.’

Story img Loader