अभिनेत्री सनी लिओनी ही सुमित सौहनीच्या ज्वेलरी ब्रॅण्ड ‘अपाला’ करिता रॅम्पवॉक करण्यास सज्ज झाली आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी विक’मध्ये ती सुमितसाठी रॅम्पवॉक करणार आहे.
सुमितचे ‘द रॉयर ट्राइब’ हे नवे ज्वेलरी कलेक्शन सनी घालून रॅम्पवॉक करणार असून ती यावेळी आदिवासी राणीच्या अवतारात दिसणार आहे. “पहिल्यांदाच मी माझ्या लूकवर नवा प्रयोग करत आहे. मी आदिवासी राणीच्या रुपात यात दिसणार आहे. हा माझ्या प्रतिमेत एक आमूलाग्र बदल असेल,” असे सनी म्हणाली. ज्वेलरीबाबत बोलताना ती म्हणाली, मला या कलेक्शनमधील ज्वेलरी आकर्षक वाटली त्यामुळे यासाठी रॅम्पवॉक करताना मला फार आनंद होईल. ‘अपाला’चा अर्थ संस्कृतमध्ये ‘सर्वात सुंदर’ असा होतो.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘अपाला’साठी सनी शो स्टॉपर
अभिनेत्री सनी लिओनी ही सुमित सौहनीच्या ज्वेलरी ब्रॅण्ड 'अपाला' करिता रॅम्पवॉक करण्यास सज्ज झाली आहे.

First published on: 06-07-2014 at 03:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone to be showstopper for apala by sumit