बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अरबाझ खान याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सनी आणि अरबाझ ‘तेरा इंतजार’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘स्पिल्ट्सव्हीला’ या टेलिव्हिजन रिआलिटी शोच्या नवव्या पर्वाच्या चित्रीकरणात देखील सनी येत्या काळात व्यस्त असणार आहे. यासोबतच ती अरबाझ सोबतच्या चित्रपटाचे देखील चित्रीकरण करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये कच्छच्या रणमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

अरबाझसोबत काम करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया देत सनीनेही वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिग्दर्शक राजीव वालियाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. कच्छमध्ये २५ दिवसांचे चित्रीकरण होणार असून उर्वरित चित्रीकरण परदेशात होणार आहे.
अरबाझसोबत या चित्रपटासाठी याआधीच करार करण्यात आला आहे. तर सनीला चित्रपटाच्या कथेची कल्पना देण्यात आली असून तिने त्वरित होकार कळवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Story img Loader