अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सनीचा मोठा चाहतावर्ग आहे. लवकरच सनी लिओनी ‘अनामिका’ या सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.
‘अनामिका’ या स्पाय थ्रिलरमध्ये सनीची मुख्य भूमिका असून या वेबसीरिजचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं आहे. येत्या १० मार्चला ही वेबसीरिज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा- “सुशांतच्या निधनानंतर…”, अंकिता लोखंडेनं केला धक्कादायक खुलासा
या ट्रेलरमध्ये नायिकेच्या भूमिकेत असलेल्या सनी लिओनीची स्मृती गेलेली दाखवण्यात आली आहे. तिला तिच्या मागच्या आयुष्याबाबत काहीच आठवत नाहीये. तिला फक्त एवढंच आठवत आहे की ३ वर्षांपूर्वी तिला डॉ. प्रशांत एका गंभीर दुर्घटनेतून वाचवलं होतं. त्यांनी फक्त तिला आपल्या घरातच नाही तर हृदयातही जागा दिली होती. एवढंच नाही तर तिला एक नावही दिलं होतं.
आणखी वाचा- ‘गंगूबाई काठियावाडी’ पाहिल्यावर रणबीरनं टाळलं प्रतिक्रिया देणं, गर्लफ्रेंड आलिया म्हणते…
‘गन- फू’ जॉनरची अनामिका वेब सीरिज एकूण ८ एपिसोडमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये समीर सोनी, सोनाली सहगल, राहुल देव, शहजाद शेख आणि अयाज खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सनी लिओनीची ही वेब सीरिज हिंदीसोबतच मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.