सोशल मीडियावरील ‘यु टय़ूब’ हे एक प्रभावी माध्यम झाले असून याच्या माध्यमातून एकाच वेळी लाखो नव्हे करोडो लोकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. सनी लिओन हिच्या आगामी ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ‘यु टय़ूब’वर प्रसारित करण्यात आला असून त्याला ७५ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या हिट्स मिळाल्या आहेत.चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांची प्रसिद्धी तसेच आगामी चित्रपटांचे ट्रेलर जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत जाण्यासाठी ‘यु टय़ूब’चा पर्याय उपलब्ध झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवरील फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर याबरोबरच तरुणाईमध्ये ‘यु टय़ूब’ विशेष लोकप्रिय आहे. याचाच फायदा जाहिरातदार व निर्माते करून घेत आहेत. ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचा ट्रेलर ५ फेब्रुवारीला ‘यु टय़ूब’वर टाकण्यात आला आणि अवघ्या आठ दिवसांत त्याला ७५ लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत. या चित्रपटात सनी लिओन विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा