पॉर्नस्टार-अभिनेत्री सन्नी लिओनीने नुकतेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, आता तिचा नवरा डॅनियल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून दोघही एकाच चित्रपटात काम करत आहेत. ‘जॅकपॉट’ या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे.
या बातमीस डॅनियलने दुजोरा दिला असून दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी विचारल्यावर आपण होकार दिल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र, चित्रपटात सनी ही आपल्या पतीसोबत प्रणयदृश्य करणार नसून ती सचिन जोशीसोबत दिसणार आहे. ‘जॅकपॉट’मध्ये नसिरुद्दीन शाह यांचीदेखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचा काही भाग नुकताच गोव्यात चित्रित करण्यात आला.

Story img Loader