बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकताच सनीचे ‘मधुबन’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. पण या गाण्याला प्रेक्षकांकडून विरोध केला जात आहे. या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
सनी लिओनीचे ‘मधुबन’ हे गाणे २२ डिसेंबर रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे कनिका कपूरने गायिले असून शरीब आणि तौशी यांनी कम्पोज केले आहे. गाणे प्रदर्शित झाल्याचे स्वत: सनी लिओनीने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. पण आता या गाण्याला विरोध केला जात आहे. या गाण्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप सनी लिओनीवर केला जात आहे. हे गाणे यूट्यूबवरुन हटवण्यात यावे अशी मागणी देखील काही यूजर्सने केली आहे.
आणखी वाचा : ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरुखचा मुलगा आर्यन खान करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
एका यूजरने ‘तुम्ही हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहात’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हे खूप वाईट आहे आणि हिंदूच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे’ असे म्हणत गाण्याला विरोध दर्शवला आहे.
पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. त्यातही ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे, हे प्रेक्षकांना समजले. आज ती अनेक चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्ये दिसत आहे. आता सध्या सनीचे मधुबन हे गाणे चर्चेत आहे.