पॉर्न स्टार सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेल्या ‘रागिनी एमएमएस २’चित्रपटाची सुरुवात हनुमान चालिसाने करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’ची सुरुवातही हनुमान चालिसाने करण्यात आली होती. त्यामुळे निर्माती एकता कपूरची अंधश्रद्धाळू बाजू त्यावेळी सर्वांनाच कळली असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची सुरुवात प्रार्थनेने केल्यास चित्रपटात कोणत्याही बाधा येणार नाहीत असे एकताचे मत आहे. भूषण पटेल दिग्दर्शित ‘रागिनी एमएमएस २’मध्ये संध्या मृदूल, प्रवीण दबास, साहिल प्रेम आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपटात आज (२१ मार्च) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader