माजी पॉर्नपरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आसून, सनी लिओनीच्या या चित्रपटाने प्रदर्शनापासून आठवड्याच्या शेवटाला २४ कोटीची कमाई केली आहे. २०११ साली आलेल्या ‘रागिणी एमएमएस’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील बढतीत सातत्य राखत आठवड्याच्या शेवटाला चांगली कामगिरी नोंदवली. शुक्रवारी चित्रपटगृहात झळकलेल्या  ‘रागिणी एमएमएस-२’च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर भारत-पाकिस्तान सामन्याचादेखील परिणाम होऊ शकला नाही. हा चित्रपट पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी नवी दिल्लीत प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. अनेकांनी चित्रपटातील सनीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

Story img Loader