पॉर्न स्टार सनी लिओनी आणि सचिन जोशीची मुख्य भूमिका असेलला ‘जॅकपॉट’ आज (१३ डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सनीने अतिशय मादक आणि स्टायलिश कपडे परिधान केले आहेत. याच कपड्यांचा दानधर्मासाठी लिलाव करण्यात येणार आहे. कपड्यांच्या लिलावातून जो निधी जमा होईल, त्याचा चॅरिटीकरिता उपयोग करण्यात येणार आहे.
हितेश चोप्रा आणि भक्ती जोशी यांनी सनीसाठी १२ ड्रेस डिझायन केले होते. या प्रत्येक ड्रेसकरिता त्याच्यासारखेच पर्यायी दोन ड्रेस तयार करण्यात आले होते. जेणेकरून, ड्रेस घालताना फाटला किंवा काही अडचण आल्यास दुसरा पर्याय उपलब्ध असावा. सनीच्या या ड्रेस लिलावाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader