आज सगळीकडे निवडणुकीचा उत्साह आहे. मुंबईसह देशभरातील ४९ मतदारसंघांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता व्रजेश हिरजी यांची एक जुनी कविता पुन्हा नव्याने व्हायरल होतेय. संजोय घोस यांनी त्यांची ही कविता पुन्हा शेअर केली आहे. “सुनो द्रौपदी शस्त्र उठालो,अब गोविंदा ना आऐंगे”, असं म्हणत महिलांना स्वंरक्षणासाठी तयार राहण्याचे आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय. मणिपूरसारखी हिंसक घटना घडून आता वर्ष झालं तरीही त्यावर योग्य ती कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा तपास अद्यापही प्रलंबित आहे. असं असतानाच हाथरस, प्रज्वल रेवण्णासारखी प्रकरणे समोर आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर देशात निवडणुका होत असल्या तरीही महिलांना सुरक्षेची जबाबदारी स्वतःलाच उचलावी लागणार आहे, कारण द्रौपदीच्या मदतीला भगवान श्रीकृष्ण आले होते, आजच्या युगात गोविंदा तुमच्या मदतीला येणार नाही, असा भावार्थ या कवितेतून निघतोय.

काय आहे कविता?

छोड़ो मेहंदी खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाए बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जाएंगे

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे…
कब तक आस लगाओगी तुम
कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से
कैसी रक्षा मांग रही हो दुःशासन दरबारों से
स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचाएंगे
सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे…
तुम ही कहो ये अंश्रु तुम्हारे
कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है
होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है
तुम ही कहो ये अंश्रु तुम्हारे,
किसको क्या समझाएंगे?
सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे…

ही कविता पुष्यमित्र उपाध्याय या प्रसिद्ध कवीची आहे. व्रजेश हिरजी यांनी गांधी जयंतीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढण्याकरता या कवितेचं अभिवाचन केलं होतं. परंतु, ही कविता आजच्या घडीलाही सुसंगत असल्याने वकिल संजोय घोस यांनी कविता शेअर केली.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांसह ८ राज्यांतील ४९ जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानाचा उत्साह जाणवतोय. त्यामुळे पहिल्या चार टप्प्यात मतदान कमी झाले असले तरीही पाचव्या टप्प्यात मतदान वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suno draupadi shastra uthalo ab govinda na aainge bollywood actors poem goes viral in the wake of voting sgk
Show comments