छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘सुपर डान्सर ४.’ या शोमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि कोरिओग्राफर गीता कपूर परिक्षक म्हणून दिसत आहेत. ‘सुपर डान्सर’ या शोमध्ये येणारे पाहुणे आणि स्पर्धकांचा डान्स हा कायमच चर्चेत असतो. या शोच्या आगामी भागांमध्ये योगगुरु बाबा रामदेव आणि अभिनेत्री तब्बू हजेरी लावणार आहेत.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुपर डान्सर शोमध्ये पाहूणे म्हणून बाबा रामदेव आणि तब्बू हजेरी लावताना दिसणार आहेत. शनिवारी बाबा रामदेव असतील, तर रविवारच्या एपिसोडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री तब्बू हजेरी लावणार आहे. सुपर डान्सरचा हा सेमी फिनाले विक आहे. प्रोमो व्हिडीओत बाबा रामदेव यांची योगासनं पाहून शिल्पा शेट्टी आश्चर्यचकित झाल्याचे दिसत आहे.

शोमध्ये तब्बू सुपर गुरू तुषार शेट्टीसोबत डान्स करताना दिसणार आहे. दरम्यान, शनिवारच्या एपिसोडमध्ये दोन एलिमिनेशन होणार आहेत. तर, येत्या ९ ऑक्टोबर रोजी शोचा फिनाले होणार आहे. या फिनाले विकमध्ये सुपर डान्सर चारचा विजेता घोषित केला जाईल. ‘सुपर डान्सर ४’चा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader