हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून आजही राजेश खन्ना यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे नेहमीच त्यांनी सर्वांची मनं जिंकली. राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस. २९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसर येथे जन्म झालेल्या राजेश खन्ना यांना ‘आराधना’ या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे कलाविश्वात त्यांना राजेश खन्ना या नावापेक्षा ‘काका’ या नावाने ओळखले जायचे.
राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे होते. मात्र काकांच्या सांगण्यावरून त्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांचे नाव बदलून राजेश खन्ना असे ठेवले होते. कदाचित त्याचा त्यांना जास्त प्रमाणात फायदा झाला. राजेश खन्ना यांच्या नावे सिनेसृष्टीत एक रेकॉर्डची नोंद आहे. आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडलेला नाही.
भारती सिंहने शेअर केला ‘बेबी बंप’चा फोटो, म्हणाली…
राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जवळपास १८० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यात ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘नमक हराम’, ‘रोटी’, ‘सौतन’, ‘अवतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. फक्त चित्रपटांपुरती नव्हे तर सिनेसृष्टीबाहेरही त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग होता. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक त्याच्या घराबाहेर उभे असायचे. विशेष म्हणजे ७० ते ८० च्या दशकात तो चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला.
विशेष म्हणजे अजूनही राजेश खन्ना यांच्या नावे एका विक्रमाची नोंद आहे. हा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. १९६९ ते १९७१ दरम्यान त्यांनी सलग १५ सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांचा हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. राजेश खन्ना यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच हे सर्व चित्रपट त्यांनी स्वबळावर हिट ठरवले. त्यांच्या कारकिर्दीतील केवळ २० चित्रपटात राजेश खन्ना यांनी इतर अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे हा देखील एक अनोखा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.
“…आणि आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो”, आदिश वैद्यची बिग बॉसच्या स्पर्धकासाठी खास पोस्ट
काकाच्या लूकवर फिदा होत्या मुली
राजेश खन्ना यांच्या लूकवर त्या काळातल्या मुली इतक्या फिदा होत्या की, रस्त्यावरून त्यांची गाडी गेल्यानंतर जी धूळ उडत होती, ती त्यांच्या कपाळावर कुंकू म्हणून लावत होत्या. आजही राजेश खन्ना यांच्या स्टारडममधील अनेक किस्से ऐकण्यासाठी फॅन्स पसंती देतात.