दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत त्यांचे चाहते खूप चिंतेत होते. मात्र आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांच्यावर कॅरोटिड आर्टरी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी त्यांनी “घरी परतलो,” अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. यात रजनीकांत यांनी एक फोटोही ट्वीट केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी “लवकर बरे व्हा,” अशा कमेंट्ही केल्या आहेत.

७० वर्षीय रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली ३० वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. यावेळी रजनीकांत यांची पत्नी लता, मुलगी सौंदर्या आणि जावई धनुष हे उपस्थित होते. 

रजनीकांत यांनी १९७५ साली चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. के भालचंद्र यांच्या अपूर्वा रागंगल या चित्रपटामधून त्यांनी आपल्या कारर्किदीचा श्री गणेशा केला. रजनीकांत हे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये ४५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. ‘बिल्लू’, ‘मुथ्थू’, ‘बासाह’, ‘शिवाजी’, ‘इथीरान’ यासारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.

Story img Loader