Jailer Trailer : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून रजनीकांत यांचे चाहते फारच खुश झाले आहेत. रजनीकांत यांच्या लूकपासून ते स्टाईलपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होताना दिसत आहे. ‘जेलर’मध्ये रजनीकांतची या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा दमदार अंदाज त्यांच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे असं ट्रेलरवरुन तरी स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जेलर’मध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि ‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘थलैवर १६९’ असे ठेवण्यात आले होते, परंतु निर्मात्यांनी नंतर ‘जेलर’ हे नाव नक्की केले.

आणखी वाचा : पाचव्या दिवशीही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची यशस्वी घोडदौड सुरूच; लवकरच पार करणार कमाईचा ‘हा’ टप्पा

‘जेलर’च्या ट्रेलरची सुरुवात वेगवान अॅक्शनने होते. चित्रपटाची कथा एका जेलरची आहे, ज्याच्या तुरुंगात एका कुविख्यात टोळीमधील एक मोठा गुंड कैद आहे. त्या टोळीतील माणसे जेलरच्या (रजनीकांत) तुरुंगातून त्याची सुटका करण्यासाठी एक योजना आखतात अन् त्यांचा जेलरशी होणारा सामना असं थ्रील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेलर मुथुवेल म्हणजेच रजनीकांत अतिशय कठोर तितकेच पण प्रामाणिकही आहेत. पण त्यांची आणखी एक बाजू आहे जी फारच भयंकर आहे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला याबद्दल ठाऊक नाहीये.

यातील रजनीकांत यांची अॅक्शन पाहून प्रेक्षक चांगलेच दंग झाले आहेत. चित्रपटात बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय चित्रपटातील तमन्ना भाटीयावर चित्रित झालेलं ‘कावाला’ हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. नेल्सन यांनीच हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. ‘जेलर’ १० ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar rajinikanth starrer most awaited jailer film trailer out now avn