सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांच्या पहिल्या सेल्फी व्हिडिओची. आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहिलेले रजनीकांत आता सोशल मीडियामुळेच चर्चेत येत आहेत. रजनीकांत आपल्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेत असताना त्यांनी फरारीमधून प्रवास केला. त्यांच्यासाठी फरारीतून प्रवास करणं यात काही नवीन नसलं तरी यावेळी त्यांनी प्रवासात चक्क सेल्फी व्हिडिओ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणून मोदींना भेटताना प्रियांकाने घातला शॉर्ट ड्रेस

रजनीकांत यांनी पहिल्यांदाच सेल्फी व्हिडीओ काढला. आता तुम्ही म्हणाल की त्यांचा हा पहिलाच सेल्फी व्हिडिओ आहे हे तुम्हाला कसं कळलं कारण या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी गाडी चालवणाऱ्या माणसाला व्हिडिओ बंद करण्यासाठी लाल बटन दाबायचं का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. रजनीकांत यांचा हा सेल्फी सोशल मीडियावर आला आणि काहीच क्षणात व्हायरलही झाला. रजनीकांत यांच्यासाठी हा व्हिडिओ काढणं असो किंवा दुसरी कोणतीही गोष्ट करणं असो रजनीकांत म्हटल्यावर अशक्यप्राय असं काहीच नाही.

मुलगी ऐश्वर्यासोबत २८ जूनला रजनीकांत अमेरिकेसाठी रवाना झाले होते. ते नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेत गेले असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले होते. रजनीकांत यांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत असून चिंतेचं कोणतंच कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिकासोबत रणवीरचा नव्या कारमधून फेरफटका

दरम्यान, रजनीकांत आणि नाना पाटेकर यांचा एकत्रित असा एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रंजित दिग्दर्शित ‘काला करिकालन’ या सिनेमातून ही दोन मोठी नावं एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक असले तरीही आतापासूनच त्याबद्दल उत्सुकतेचं वातावरण पाहायाल मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar rajinikanths first ever selfie video is simply epic