पनवेलमधील वादग्रस्त फार्म हाऊसच्या मालकीहक्कावरून सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या वनखात्याशी कायदेशीर लढाई देत आहेत. मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्णयामुळे खान कुटुंबीयांसमोर पनवेलमधील मालमत्ता गमावण्याची वेळ आली होती. खान कुटुंबीयांनी वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या राज्य सरकारच्या दाव्याला मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे समर्थन दिले होते. मात्र, आता खान कुटुंबीयांच्या ३५ एकरांच्या मालमत्तेचा समावेश खासगी वनक्षेत्रात न करण्याचे आदेश ३० जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टाचा सलमान खानच्या बाजूने निकाल
पनवेलमधील वादग्रस्त फार्म हाऊसच्या मालकीहक्कावरून सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या वनखात्याशी कायदेशीर लढाई देत आहेत.
First published on: 04-02-2014 at 05:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court rules in favour of salman khan