मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येऊ लागल्यामुळे बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या अनेकांची पावले मराठी चित्रपटांकडे वळू लागली आहेत. आता सुप्रिया कर्णिक ही अभिनेत्रीही मराठी चित्रपटात काम करत आहे. ‘ताल’, ‘वेलकम’ अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाची आणि लक्षणीय भूमिका बजावणाऱ्या सुप्रियाचा ‘लेक लाडकी’ हा पहिला मराठी चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून त्यात तिने मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, प्रतीक्षा लोणकर अशा तगडय़ा कलाकारांसह काम केले आहे.
नात्यांमधील संवेदनशीलता, कुटुंबांतील सदस्यांची ससेहोलपट या विषयावर आधारित या चित्रपटात सुप्रिया कर्णिक एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सुप्रिया, मोहन जोशी व प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. यात तिच्यासह मिलिंद गुणाजी काम करणार आहे. तर तिच्या बहिणीच्या भूमिकेत प्रियांका यादव आहे. या चित्रपटाची कथा प्रियांका यादव व प्रतीक्षा लोणकर यांच्यातील ‘आई व मुली’च्या प्रेमावर फिरते. ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची कथा नीता देवकर यांची आहे. इंद्रराज फिल्म या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा