झी मराठी वाहिनीवर नुकतंच एका नव्या कार्यक्रमाची भर पडली आहे. शुक्रवारी २९ जुलैपासून झी मराठीवर बस बाई बस या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंना राज्यातील सत्तांतर, दिल्लीतील राजकारणासह अनेक कौटुंबिक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची त्यांनी फार मनमोकळेपणाने उत्तर दिली. यावेळी त्यांनी सूत्रसंचालनक सुबोध भावेसोबत वेगवेगळ्या विषयांवर धम्माल गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतराबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी फार मुद्देसूदपणे त्या प्रश्नाचे उत्तर दिले. “महाराष्ट्रात आता सत्तांतर घडलं काय वाटत तुम्हाला उद्धवजी कमी पडले की देवेंद्रजी भारी पडले?” असा प्रश्न सुबोध भावेने सुप्रिया सुळेंना विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहताक्षणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुजरात आणि महाराष्ट्राचे संबंध…”

त्यावर त्या म्हणाल्या, “खरंतर हे सांगणं थोडंस अवघड आहे. कारण सत्ता येते आणि जाते हे मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा पाहिलं आहे. यात कोणी कमी किंवा भारी होत नाही आणि आता महाराष्ट्राचे राजकारण हे महाराष्ट्रावाले करत नाहीत तर दिल्लीवाले करत आहेत. त्यामुळे दिल्लीवाल्यांची यंत्रणा महाराष्ट्रावर किंवा सरकारी यंत्रणेला भारी पडली.”

यापुढे सुबोध भावेने त्यांना लगेचच महाराष्ट्र दिल्लीतून चालवला जातो? असा प्रश्न विचारला. “आजपर्यंत मला असं वाटत नव्हतं. पण हा नवा ट्रेंड आलाय”, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. त्यांनी या दोन्ही प्रश्नाला दिलेल्या मुद्देसूद उत्तराने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता घरातही पवार विरुद्ध शिंदे होणार…”

दरम्यान बस बाई बस या कार्यक्रमाचा अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सुबोध भावे याचा ‘बस बाई बस’हा कार्यक्रम काल २९ जुलैपासून प्रक्षेपित झाला आहे. हा कार्यक्रम खास स्त्रियांसाठी असणार आहे. यात सुबोध स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule talk about maharashtra politics eknath shinde uddhav thackeray devendra fadnavis bas bai bas tv show nrp