मुलांचा आवडता नाताळ सण आता जवळ आला आहे आपल्या सगळ्यांचा आवडता सांताक्लॉज दरवर्षीप्रमाणे खूप आनंद, भेटवस्तू घेऊन येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो जो आपला सांताक्लॉज बनून आनंद घेऊन येतो. आपलं आयुष्य सुंदर बनवतो. पण ख्रिसमसला आपण या सांताक्लॉजची विशेष करून वाट बघतो, की तो येईल आणि आपल्याला छानसं सरप्राइझ गिफ्ट मिळेल. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये मुलांची सुंदर गाणी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. आता कार्यक्रमामध्ये सहा फायनलिस्ट आहेत.. मीरा, चैत्यन्य, सई, अंशिका, उत्कर्ष आणि स्वराली. या कार्यक्रमात छोटा सांताक्लॉज आला आणि त्याने सुरवीरांना, कॅप्टन्सना भेटवस्तू दिल्या. हा सांताक्लॉज दुसरा कोणी नसून आपल्या सगळ्यांचा लाडका ज्याने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे असा मॉनिटर आहे.

हर्षद सांताक्लॉज बनून मंचावर आला. सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर यावेळेस भाई – व्यक्ती कि वल्ली या चित्रपटाची टीमदेखील आली होती. हर्षदने सांताक्लॉज बनून छोट्या सुरविरांना आणि कॅप्टन्सना पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं दिली. खरं तर पु. ल. देशपांडे हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील सांताक्लॉज आहेत. कारण सांताक्लॉज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद घेऊन येतो. अगदी तसंच पु. ल. देखील त्यांच्या कार्यातून आपल्याला आनंद देत राहिले. त्यांच्या लिखाणामुळे आपल्या आपल्या दु:खाचा विसर पडतो.

Story img Loader